Aurangabad च्या नामांतरावरून Uddhav Thackeray यांचा Devendra Fadnavis यांना टोमणा | Dharashiv

2023-02-25 14

औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर', तर उस्मानाबादचं नाव 'धाराशिव' या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा आम्ही प्रस्ताव मंजूर केले होते, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांचा नावाचा जो प्रस्ताव होता, या प्रस्तावांना आज मंजुरी मिळालेली आहे. म्हणून सद्याच्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारला एवढ्या पुरता धन्यवाद देतो की, इतर अनेक निर्णयांनी त्यांनी स्थगिती दिली होती, मात्र आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय घेतला होता, त्याला स्थगिती दिली नाही. तसंच जे नामांतर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी करू म्हंटल होतं, पण त्यांना करता आलं नाही. मात्र ते आम्ही करू शकलो, याचा मला अभिमान आहे, असे ठाकरेंनी उपमुख्यमंत्रील देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेताच टोला लगावला.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #Aurangabad #ChatrapatiSambhajiNagar #Dharashiv #ImtiyazJaleel #Osmanabad #AmbadasDanve #ShivSamvad #AadityaThackeray #G20 #BJP #Shivsena #CabinetMeeting #Mumbai #CentralGovernment #Maharashtra

Videos similaires